२१ हजार वह्यांचा वापर करून रेखाटले छत्रपती संभाजी महाराजांचे चित्र

Foto


पैठण (प्रतिनिधी)

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पैठण येथे आमदार विलास भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने २१ हजार वह्यांचा वापर करून तब्बल एक एकर परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचे १०० बाय १०० फुटांच्या आकारातील चित्र साकारण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे परिसरात जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या चित्राला तब्बल सहा दिवसांचा कालावधी लागला. यासाठी ५० युवकांनी एकत्रित येत ही कलाकृती उभी केली आहे. वह्यांची मांडणी, रंगसंगती व चित्रातील बारकावे योग्यरित्या साकारण्यात आले आहे. यामुळे हे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

गेवराई येथील उद्देश पघळ यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यासाठी नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर, शेखर शिंदे यांनीही आयोजनासाठी विशेष सहकार्य

केले.

आमदार विलास भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम साकारण्यात आला असल्याची माहिती भुषण कावसानकर, शेखर शिंदे यांनी दिली. या उपक्रमातील महत्त्वाची बाब म्हणजे चित्रासाठी वापरण्यात

आलेल्या २१ हजार वह्या शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत जयंती उत्सव साजरा करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.

https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions